About Vishwakarma

श्री. संजय अप्पासाहेब सुतार (चेअरमन)
सौ. मंगल संजय सुतार (डायरेक्टर)
नविन विचाराचे, नव्या उन्नतीचे, सर्वांगीण उत्कर्षाचे... शाश्वत शेती अभियान (Mission Revolution for Sustainable Agriculture)

भारत हा कृषीप्रधान देश म्हणून ओळखला जातो. पूर्वी भारतीय खेडी स्वयंपूर्ण होती. संपूर्ण अर्थव्यवस्था ही कृषी क्षेत्रावर आधारीत होती आणी आरोग्य उत्तम राहण्यासाठी आयुर्वेदाचा आधार होता. 'हरितक्रांतीची' गरज म्हणून रासायनिक खतांचा वापर वाढत गेला. रोग आणि किड नियंत्रणासाठी रासायनिक बुरशी नासके व किडनाशकांचाही वापर वाढत गेला. या रासायनिक औषधांचे अंश हे पिके व फळांच्या माध्यमातून मानवी शरीरावर दुष्परिणाम करीत आहेत. रोगांची आणी रुग्णांची संख्या दररोज वाढतेच आहे. मानवी जीवनच धोक्यात आले आहे.

आता पुन्हा एकदा नव्याने जीवन सुजलाम् सुफलाम् करण्यासाठी पुन्हा जुन्या शाश्वत शेतीचा विचार कृतीत आणावा लागेल. रासायनिक अवशेष विरहित, सेंद्रिय शेती करावी लागेल. यामुळे पुरेशा प्रमाणात उच्चतम पौष्टिक गुणवत्ता असलेले खाद्यान्न निर्माण होईल. जमिनीची सुपीकता वाढून तिचा शाश्वतपणा टिकून राहील. सुक्ष्मजीव, वनस्पती व प्राण्यांचे जीवनचक्र सुरक्षित राहील. भूमी व जल या दोहोंचे संरक्षण होईल. सध्याच्या शेती पद्धतीतून निर्माण होणारे प्रदूषण थांबून मानवी जीवनमान सुधारण्यास नक्कीच मदत मिळेल.

कोणत्याही पिकाला सगळी अन्नद्रव्ये एकाचवेळी लागत नाहीत. त्यांच्या वाढीनुसार व पिकांच्या एकूण कालावधीनुसार अन्नद्रव्यांची मात्रा कमी अधिक लागते. या गोष्टींचा अभ्यास करून किती शेतकरी खाते वापरतात? पिकांच्या कालावाधीसाठी लागणाऱ्या सर्व निविष्ठांच्या (म्हणजे पिकासाठी देण्यात येणारे जैव व रासायनिक घटक) वापरायचे व्यवस्थापन, वेळापत्रक किती लोकांच्याकडे आहे ? ९०% लोकांना वरील प्रश्नांची उत्तरे माहित नाहीत. १५ ते २० वर्षे शेती करत असूनही खतांचे डोस काढता नं येणारे, नेमकी कोणती खते वापरायाची हे माहित नसणारे जवळपास ७०% आहेत. हे विदारक वास्तव आहे.

त्यामुळे शेतकऱ्यांना आपली जमीन शाबूत ठेवून, ती चांगली सुपिक करून, पुढच्या पिढीस हस्तांतरण करावयाची असल्यास आजच जागरूक व्हावे लागेल. अभ्यास करून, समजावून घेऊन शेती करावी लागेल. सुपीकता वाढवण्याचे आव्हान पेलावेच लागेल अन्यथा पुढची पिढी आम्हाला माफ करणार नाही.

त्यामुळे नवीन विचाराचे, नव्या उन्नतीचे, सर्वांगीण उत्कर्षाचे

'शाश्वत शेती अभियान (Mission Revolution for Sustainable Agriculture)' आम्ही घेणून आलो आहोत. शेतकऱ्यांना 'कर्जमुक्त' करण्यासाठी हे अभियान निश्चितच बळ देईल याची खात्री वाटते.